प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या
By Admin | Updated: May 19, 2016 00:29 IST2016-05-19T00:29:45+5:302016-05-19T00:29:45+5:30
पळसे गावात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ज्योती सुदाम थेटे (२२) या युवतीची प्रेमप्रकरणातून शशिकांत शांताराम टावरे (२८) या युवकाने धारदार शस्त्राने हत्या केली

प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या
नाशिक : पळसे गावात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ज्योती सुदाम थेटे (२२) या युवतीची प्रेमप्रकरणातून शशिकांत शांताराम टावरे (२८) या युवकाने धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेनंतर परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, पळसे गावात राहणाऱ्या ज्योती सुदाम थेटे (२२) व शशिकांत यांच्यात प्रेमप्रकरण होते. दरम्यान, रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शशिकांत याने ज्योतिवर धारधार शस्त्राने हल्ला केला व स्वतलाही गंभीर जखमी करुन घेतले. या हल्ल्यात ज्योतीचा मृत्यू झाला असून शशिकांत याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. खून झाल्याची बातमी समजताच पळसे गावात जमाव जमल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त श्रीकांत धीवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कुमकसह पळसे गावात दाखल झाले. दरम्यान, कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, म्हणून तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. या हत्येमागे एकतर्फी प्रेमप्रकरण असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.