नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून

By Admin | Updated: September 4, 2015 00:39 IST2015-09-04T00:39:30+5:302015-09-04T00:39:30+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे (४१) यांच्यावर गुरुवारी दुपारी मोहननगर येथील राहत्या घरी तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला

The murder of corporator Avinash Tekawade | नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून

नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे (४१) यांच्यावर गुरुवारी दुपारी मोहननगर येथील राहत्या घरी तीन अज्ञात हल्लेखोरांनी चाकूहल्ला केला. छातीत आणि पोटावर वार केल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात दारातच कोसळले. त्यांना तातडीने चिंचवड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. टेकावडे त्यांच्या संपर्क कार्यालयातून त्यांच्या सदनिकेकडे येत होते. तेव्हा जिन्यावर दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली आणि लगेच त्यांच्यावर चाकूहल्ला केला.
झटापटीचा आवाज ऐकून पत्नी सुजाता दार उघडून बाहेर आल्या. त्या वेळी हल्लेखोर इमारतीतून बाहेर पडून सीमाभिंतीवरून उड्या मारून ते पळून गेले. खाली थांबलेला एक जण दुचाकी सोडून इमारतीच्या प्रवेशद्वारातून पळून गेला.

Web Title: The murder of corporator Avinash Tekawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.