चिमुकल्या युगची हत्या

By Admin | Updated: September 3, 2014 01:55 IST2014-09-03T01:55:09+5:302014-09-03T01:55:09+5:30

दहा कोटी रुपयांची खंडणी मागणा:या क्रूरकर्मानी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची अत्यंत क्रूरपणो हत्या केली.

Murder of the Chinmya era | चिमुकल्या युगची हत्या

चिमुकल्या युगची हत्या

नागपूर : दहा कोटी रुपयांची खंडणी मागणा:या क्रूरकर्मानी अखेर चिमुकल्या युग मुकेश चांडक याची  अत्यंत क्रूरपणो हत्या केली. त्याचा मृतदेह खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबुळखेडा गावाजवळच्या पुलाखालून आज शहर पोलिसांनी ताब्यात घेतला. दरम्यान, अपहृत युगची अपहरणकत्र्यानी हत्या केल्याच्या वृत्ताने उपराजधानीकरांना अक्षरश: हादरवून सोडले आहे.  
 छापरूनगर चौकाजवळच्या गुरुवंदना अपार्टमेंटमध्ये राहणा:या डॉ. मुकेश चांडक (वय 4क्) यांना ध्रृव (वय 11) आणि युग (वय 8) अशी दोन मुले होती.  हे दोघेही वाठोडय़ातील सेंटर पॉईंट स्कूलमध्ये शिकत होते.  सोमवारी दुपारी 4 वाजता सेंटर पॉईंट स्कूलच्या बसने युग घरी परतला. मात्र, तो घरात गेला नाही. 

 

Web Title: Murder of the Chinmya era