दहा रुपयांवरून परळ येथील चिकन विक्रेत्याची हत्या

By Admin | Updated: January 28, 2015 05:14 IST2015-01-28T05:14:52+5:302015-01-28T05:14:52+5:30

चिकनचे उरलेले दहा रुपये मागितल्याने तिघाजणांनी चिकन विक्रेत्याचा लाथा-बुक्यांनी मारुन खून करण्याची घटना परळ येथील धनमील नाका परिसरात घडली.

The murder of a chicken seller of Parel worth ten rupees | दहा रुपयांवरून परळ येथील चिकन विक्रेत्याची हत्या

दहा रुपयांवरून परळ येथील चिकन विक्रेत्याची हत्या

मुंबई: चिकनचे उरलेले दहा रुपये मागितल्याने तिघाजणांनी चिकन विक्रेत्याचा लाथा-बुक्यांनी मारुन खून करण्याची घटना परळ येथील धनमील नाका परिसरात घडली.
फिरोज शेख (३५) असे ठार झालेल्या तरुणांचे नाव असून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. एलफिस्टन येथे राहत असलेल्या फिरोजचा परळच्या ना.म. जोशी मार्गावरील धनमील नाका येथे चिकन विक्रीचा व्यवसाय होता. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडे याच परिसरात राहणारे तीन इसम चिकन घेण्यासाठी आले होते. त्यांना चिकन देऊन झाल्यानंतर फिरोजने त्यांच्याकडे १०५ रुपये मागितले. मात्र आरोपींनी केवळ ९५ रुपयेच दिले. त्यामुळे फिरोजने त्यांच्याकडे आणखी १० रुपयांची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

Web Title: The murder of a chicken seller of Parel worth ten rupees