दाभोलकर हत्येप्रकरणी अंनिस जाणार हायकोर्टात
By Admin | Updated: June 7, 2015 01:40 IST2015-06-07T01:40:36+5:302015-06-07T01:40:36+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा सीबीआयकडून सुरू असलेला तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्र

दाभोलकर हत्येप्रकरणी अंनिस जाणार हायकोर्टात
नाशिक : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा सीबीआयकडून सुरू असलेला तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे.
डॉ. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, न्यायालयाच्या सुट्या संपल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात याचिका दाखल केली जाईल. २० आॅगस्टला डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण होत आहेत; मात्र त्यांच्या मारेकऱ्यांचे कोणतेही सुगावे लागलेले नाहीत.
राज्य शासनानेही जणू हात झटकले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील असंतोषाला वाट करून देण्यासाठी, २० जुलै ते २० आॅगस्ट राज्यभरात अंनिसतर्फे निदर्शने केली जाणार आहेत. (प्रतिनिधी)