व्यावसायिकाचा खून; एकाला अटक

By Admin | Updated: June 9, 2014 23:30 IST2014-06-09T23:30:44+5:302014-06-09T23:30:44+5:30

व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीला 15 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

The murder of the businessman; One arrested | व्यावसायिकाचा खून; एकाला अटक

व्यावसायिकाचा खून; एकाला अटक

>पुणो : एक कोटीच्या खंडणीसाठी केटरिंग व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीला 15 जूनर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
जफर ऊर्फ जफर बंडा अब्दुल कय्युम हकिम (वय 41, रा. गफार बेग स्ट्रीट, भीमपुरा गल्ली) असे आरोपीचे नाव आहे.  दलाराम मुलाजी राठोड (वय 4क्, रा. राठोड हाऊस, धनकवडी) यांचा 26 मे रोजी खून झाला आहे.  या प्रकरणी सहा जणांना अटक केलेली असून, सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.  राठोड हे मार्केट यार्ड परिसरातील नावाजलेले केटरिंग कॉन्ट्रक्टर होते. आपल्या नातेवाइकांसह ते हा व्यवसाय करीत होते. या प्रकरणी त्यांचा पुतण्या प्रताप गणोश राठोड यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. राठोड यांनी 25 मे रोजी यश लॉन्स येथे केटरिंगची ऑर्डर घेतली होती. यश लॉन्सचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते रात्नी उशिरा घरी जात होते, तर इतर कामगार पीकअप टेम्पोत केटरिंगचे सामान भरून जात होते. 
त्या वेळी त्यांना रस्त्याच्याकडेला राठोड यांची दुचाकी पडलेली दिसली. केटरिंग कामगारांनी राठोड यांच्या दुचाकीला पाठलाग करणा:या 
कारचा नंबर पाहिला होता. 
त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा माग काढला.  (प्रतिनिधी)

Web Title: The murder of the businessman; One arrested