पूर्ववैमनस्यातून भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा खून

By Admin | Updated: May 14, 2016 03:06 IST2016-05-14T03:06:59+5:302016-05-14T03:06:59+5:30

गोवारे येथील माजी सरपंच व भाजपाचे कऱ्हाड दक्षिण विभागाचे सरचिटणीस बशीर शिराजउद्दीन इनामदार (वय ५८, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला

The murder of the BJP office bearer of prejudice | पूर्ववैमनस्यातून भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा खून

पूर्ववैमनस्यातून भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा खून

कऱ्हाड : गोवारे येथील माजी सरपंच व भाजपाचे कऱ्हाड दक्षिण विभागाचे सरचिटणीस बशीर शिराजउद्दीन इनामदार (वय ५८, रा. शिवाजी हौसिंग सोसायटी, कऱ्हाड) यांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. चौंडेश्वरीनगर येथील कृष्णा कालव्यात शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. या खून प्रकरणात तिघांची नावे निष्पन्न झाली असून, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासांतून समोर येत आहे.
विकास आकाराम जाधव, राहुल बबन जाधव (दोघेही, रा. चौंडेश्वरीनगर, गोवारे) व अनिल बाबासाहेब मोरे (मूळ रा. खटाव, सध्या रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. यातील राहुल जाधव व अनिल मोरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या खुनानंतर शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The murder of the BJP office bearer of prejudice