नागपूरकरांच्या प्रेमात पडला "मुन्ना मायकल" (फोटो स्टोरी)
By Admin | Updated: July 13, 2017 13:31 IST2017-07-13T13:31:11+5:302017-07-13T13:31:11+5:30
न्सिंग स्टार टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या झुमके स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले.

नागपूरकरांच्या प्रेमात पडला "मुन्ना मायकल" (फोटो स्टोरी)
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि . 13 - डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या झुमके स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले. जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिनानिमित्त आणि मुन्ना मायकल या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर व निधी तसेच सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन काल बुधवारी नागपुरात आले होते. यावेळी टायगर श्रॉफ याने अभिनेत्री निधी अगरवालसमवेत दिलखेचक अदांसह ठेका धरला. यावेळी मुन्ना मायकलच्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती.
नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये टायगर श्रॉफने मायकल जॅक्सनला अनोखी नृत्यांजली वाहिली. लोकमत आणि प्रीति आयआयटी पिनॅकल यांच्या सहयोगाने मायकल जॅक्सनला नृत्यांजली म्हणून टायगरचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.