१०० टक्के अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By Admin | Updated: March 2, 2015 01:47 IST2015-03-02T01:47:16+5:302015-03-02T01:47:16+5:30

राज्यातील ड प्रवर्गातील नगरपालिकांना १०० टक्के अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने

Municipal employees' front for 100 percent subsidy | १०० टक्के अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा

१०० टक्के अनुदानासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चा

मुंबई : राज्यातील ड प्रवर्गातील नगरपालिकांना १०० टक्के अनुदान देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने ९ मार्चला आझाद मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. यावेळी धरणे देऊन हजारो कर्मचारी सरकारकडे अनुदानाची मागणी करणार आहेत.
वारंवार आश्वासन देऊनही आधीच्या सरकारने अनुदान दिला नसल्याचा आरोप संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश तांडेल यांनी केला आहे. २००० सालापूर्वीच्या कंत्राटी, रोजंदारी आणि मानधनावर काम करणाऱ्या कामगारांना कायम सेवेत घेण्याची मागणी तांडेल यांनी केली आहे. सद्यस्थितीत नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन सहा महिन्यांपर्यंत थकत असल्याचे त्यांनी सांगितले. अनुदानाअभावी पालिकांकडे पैसा नसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनासाठी सरकारकडे भीक मागावी लागत आहे. त्यामुळे सरकारने अनुदानाची तरतूद केल्यास कर्मचाऱ्यांना वेळीच वेतन आणि पेन्शन मिळेल, असा तांडेल यांचा दावा आहे. सहा संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदस्थापना, ज्येष्ठता याद्या, पदोन्नती व वरिष्ठ वेतन श्रेण्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. परिणामी शासनाने ही सर्व प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याची संघटनेची मागणी आहे. भोकर, आर्णी, नेर या नगरपंचायतींसोबत नव्याने येऊ घातलेल्या १३८ नगरपंचायतींमध्ये संबंधित विभागातील ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Municipal employees' front for 100 percent subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.