शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात वाजणार महापालिका निवडणुकीचे पडघम?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 11:36 IST

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सज्ज आहे.

मुंबई - गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, औरंगाबाद यांच्यासह अनेक प्रमुख महापालिकांचा यात समावेश आहे. या निवडणुका कधी होणार असा प्रश्नच सगळ्यांना पडला आहे. त्यात दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकांबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नवीन वर्षात राज्यात निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महापालिका निवडणुका कधी लागणार असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारला त्यावर कदाचित जानेवारी महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं. मात्र हाच प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला असता निवडणुका कधी हे न्यायव्यवस्था आणि ईश्वरालाच ठाऊक असं सांगितले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक इच्छुक उमेदवारांनी आतापासून मोर्चेबांधणी केली आहे. यंदाची निवडणूक ही विधानसभा निवडणुकीची चाचणी असणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून थेट निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ असेल. अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष आमनेसामने आले होते. परंतु या निवडणुकीत भाजपानं उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. 

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपा सज्ज आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा चंग भाजपा नेत्यांनी बांधला आहे. त्यात यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी डोईजड जाणार आहे. कारण बाळासाहेबांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मोठे बंड शिवसेनेत झाले आहे. त्यात बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाऊ म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार, १२ खासदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारलं. त्यामुळे शिवसेनेत सध्या २ गट पडले आहेत. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याची परवानगी कुणाला दिली नाही. शिवसेनेत सध्या शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे २ गट तयार झालेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे २ गट समोरासमोर येणार असून त्यात लोकांचा कौल कुठल्या सेनेकडे असेल हे पाहणे गरजेचे आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेElectionनिवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा