शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप आराखड्याचे काम महापालिकांनी गुंडाळले! निवडणूक आयोगाकडून नवीन आदेशाची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 06:47 IST

Municipal Corporation : राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एक आदेश काढला. या आदेशात राज्यातील २१ महापालिकांना प्रभाग रचनेनुसार प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन आदेशानुसार राज्यातील २१ महापालिकांनी आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे सुरू केलेले काम राज्य शासनाने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे थांबविले आहे.  राज्य निवडणूक आयोगाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी एक आदेश काढला. या आदेशात राज्यातील २१ महापालिकांना प्रभाग रचनेनुसार प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. तीन वाॅर्डांचा एक प्रभाग करावा. प्रभाग कशा पद्धतीने तयार करावेत याच्या मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या. महापालिकांनी समिती स्थापन करून कामाला सुरुवात केली. इच्छुक उमेदवारांचे या प्रारूप आराखड्याकडे लक्ष लागले होते. आपल्या सोयीनुसार प्रभाग तयार व्हावा अशी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांची इच्छा होती. महापालिकांनी गोपनीय पद्धतीने कामाला सुरुवात केली. काही ठिकाणी प्रारूप आराखडा ‘लिक’ही झाला. काही महापालिकांचे काम तर अंतिम टप्प्यात पोहाेचले होते. आराखडा तयार आहे, एवढेच आयोगाला कळविणे बाकी होते. त्यातच बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत शासनाने राज्यातील महापालिका आणि नगरपरिषदांमधील सदस्यसंख्या १७ टक्के वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महापालिका अधिनियम कलम ५ मधील कायद्यात बदल करण्यात आला. त्यावर आता राज्यपाल यांनी  शिक्कामोर्तब करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेला किमान दोन महिने लागण्याची शक्यता आहे. कायदा अंमलात आल्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून संबंधित महापालिकांना पुढील निर्देश प्राप्त होतील, असेही सूत्रांनी सांगितले. 

या आहेत २१ महापालिकाठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पनवेल, मीरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर व चंद्रपूर या महापालिकांना प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

निवडणूक आयोगाचे आदेशाचे पालननिवडणूक आयोगाने  दिलेल्या आदेशानुसार काम सुरू होते. आता त्यात बदल झाला असल्याने आयोगाच्या पुढील आदेशाची वाट बघतोय.    - वरिष्ठ अधिकारी, औरंगाबाद, मनपा.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिका