शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२९ महापालिकांमध्ये महापौर उपमहापौर निवडीला वेग, बहुमत, तरीही इच्छुकांची भाऊगर्दी आणि रूसवे फुगवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:23 IST

Municipal Corporation Mayor Election: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाल्यावरदेखील अद्याप महापौर, उपमहापौरांची निवड झालेली नाही. यासाठीच्या हालचालींना आता वेग आला असून इच्छुकांनी आपआपल्या परीने जोरदार फिल्डींग लावल्याने अनेक ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे झाल्यावरदेखील अद्याप महापौर, उपमहापौरांची निवड झालेली नाही. यासाठीच्या हालचालींना आता वेग आला असून इच्छुकांनी आपआपल्या परीने जोरदार फिल्डींग लावल्याने अनेक ठिकाणी चुरस निर्माण झाली आहे. चंद्रपूर, भिवंडी, मालेगाव, लातूर महापालिका वगळता बहुतांश ठिकाणी भाजप-शिवसेना यांची निर्विवाद सत्ता असली तरी महायुतीच्या त्रांगड्यातून मार्ग काढण्यासाठी चर्चेचा खल सुरू आहे. ज्या महापालिकांमध्ये चित्र एकदम स्पष्ट आहे म्हणजेच कोणाचा महापौर होणार याबद्दल संदिग्धता नाही तेथे इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यातून एकाचे नाव निश्चित करण्यासाठीची नेतेमंडळींची कसरत सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. उपमहापौरपदासाठीदेखील इच्छुकांचे रुसवेफुगवे दूर करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई - दुसऱ्या आठवड्यात निवड मुंबई : महापौर-उपमहापौर निवडीसाठी आयुक्तांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असली तरी, भाजप-शिंदेसेनेत पदांबाबत एकवाक्यता नाही. यामुळे निवड फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच होईल.  

ठाण्यात शिंदेसेनेचा महापौर होणार ठाणे : महापौरपदी शिंदेसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून कृष्णा पाटील यांनी अर्ज भरला. ठाण्यात सव्वा वर्षानंतर महापौर आणि उपमहापौर बदलले जातील. बिनविरोध निवड निश्चित आहे. 

केडीएमसीमध्ये महायुतीचेच महापौर-उपमहापौर कल्याण-डोंबिवली : महापौरपदासाठी शिंदेसेनेच्या हर्षाली थवील-चौधरी, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांची बिनविरोध निवड निश्चित आहे. येथे मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिला आहे.  

उल्हासनगरला महापौरपद शिंदेसेना-ओमी कलानी टीमकडे उल्हासनगर : महापौरपदासाठी शिंदेसेनेतील ओमी कलानी टीमच्या अश्विनी निकम, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे नगरसेवक अमर लुंड यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. निवडणुकीनंतर येथे भाजप-शिंदेसेनेने युती केली. येथेही बिनविरोध निवड निश्चित आहे. 

नवी मुंबईचा महापौर गणेश नाईक निश्चित करणारनवी मुंबई : महापौर, उपमहापौर निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या ठिकाणी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक हेच दोन्ही पदे निश्चित करतील, अशी शक्यता आहे. 

पनवेलमध्ये १० फेब्रुवारीला निवड पनवेल : महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या महापालिकेत भाजपला बहुमत असल्याने तोडफोडीचे राजकारण येथे होणार नाही. माजी खा. रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर हे दोन्ही पदांसाठी नावे निश्चित करणार आहेत. 

बविआसह भाजपकडूनही अर्ज दाखलवसई-विरार : महापौरपदासाठी बहुजन विकास आघाडीतर्फे अजीव पाटील, प्रफुल्ल साने आणि निषाद चोरघे यांनी, तर भाजपतर्फे ॲड. दर्शना त्रिपाठी यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केले.  उपमहापौरपदासाठी बविआकडून कन्हैय्या भोईर व मार्शल लोपिस यांनी, तर भाजपतर्फे नारायण मांजरेकर यांनी अर्ज दाखल केले.  

भाजपसह मिरा-भाईंदर विकास आघाडीनेही भरले अर्जमिरा-भाईंदर : भाजप आ. नरेंद्र मेहता यांच्या भावजय डिंपल मेहता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर उपमहापौरपदासाठीही मेहता यांच्या मर्जीतील ध्रुवकिशोर पाटील यांनी अर्ज भरला आहे.  विकास आघाडीच्या वतीनेही काँग्रेसच्या रुबीना शेख यांनी महापौरपदासाठी तर शिंदेसेनेच्या वंदना पाटील यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

सेक्युलर फ्रंटचा महापौरपदावर दावा भिवंडी : महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. काँग्रेसचे, राष्ट्रवादी (शरद पवार) व समाजवादीने एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन करत महापौरपदावर दावा केला आहे.

नाशिकमध्ये भाजपतच चुरसनाशिक : महापौरपद भाजपलाच मिळणे अटळ आहे. भाजपचे ज्येेष्ठ नेते डॉ. बाळासाहेब आहेर यांची कन्या आणि स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती हिमगौरी आडके यांचे नाव आघाडीवर आहे. 

मालेगावी सेक्युलर फ्रंटचा महापौर शक्यमालेगाव : इस्लाम (इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र) आणि समाजवादी पक्ष यांच्या मालेगाव सेक्युलर फ्रंटने सर्वाधिक ४० जागा जिंकल्या आहेत. ३ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने या फ्रंटला पाठिंबा दिल्याने सेक्युलर फ्रंटचा महापौर होईल हे निश्चित आहे. इस्लामच्या शेख नसरीन खालीद हाजी यांचे नाव अग्रभागी आहे. 

जळगावात भाजप-शिंदे सेनेत चढाओढजळगाव : भाजप आणि शिंदे सेनेने महापौर व उपमहापौर अशा दोन्ही पदांसाठी अर्ज घेतल्याने जळगावात दोन्ही पक्षातच चढाओढ आहे. सोमवारी किंवा थेट निवडीच्या दिवशी पंधरा मिनिटे आधी नाव जाहीर होऊ शकते. 

धुळे महापौरपदाची निवड ६ फेब्रुवारीलाधुळे : महापौरांची निवड येत्या ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.  

अकोला महापालिकेवर भाजपचा झेंडाअकोला : महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर ४५ मते मिळवून विराजमान झाल्या. त्यांनी उद्धवसेनेच्या सुरेखा काळे यांचा पराभव केला. 

सोलापुरातही भाजपचाच होणार महापौरसोलापूर : महापौरपदासाठी २ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. भाजपचा महापौर होणार, हे निश्चित आहे. विनायक कोंड्याल आणि अनंत जाधव यांची नावे चर्चेत आहेत. 

कोल्हापुरात आज नावावर शिक्कामोर्तबकोल्हापूर : महापौरपदाचा उमेदवार निश्चित करण्यासाठी शनिवारी महायुतीची बैठक होईल. भाजपच्या विजयसिंह खाडे-पाटील व रुपाराणी निकम या दोघांपैकी एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. महापौर निवड ६ फेब्रुवारीला आहे.

सांगली महापौरपदाची १० फेब्रुवारीला निवडसांगली : सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या महापौरपदाची निवड १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. भाजप-राष्ट्रवादी व शिंदेसेनेच्या युतीचा निर्णय होणार का? याची चर्चा सुरू आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपकडून कोणाला संधी?पिंपरी : महापौरपदी ६ फेब्रुवारीस निवड होणार आहे. भाजपकडे ८५ नगरसेवक आहेत. शीतल ऊर्फ विजय शिंदे, शत्रुघ्न काटे, नितीन लांडगे, तुषार हिंगे, सलग दोनदा बिनविरोध झालेले रवी लांडगे, माऊली जगताप, मंदार देशपांडे यांच्या नावांची चर्चा आहे.

पुणे महापालिकेत महिलाराजपुणे : निर्विवाद बहुमत मिळवलेल्या भाजपकडून चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजूषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरादा बापट, निवेदिता एकबोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

लातूरमध्ये माळ कोणाच्या गळ्यात पडणार?लातूर : महापौर पदाची निवडणूक येत्या ९ फेब्रुवारी रोजी होत आहे. कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून महापौर पद अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. काँग्रेसकडे या प्रवर्गातील तीन तर वंचित बहुजन आघाडीकडे दोन महिला नगरसेवक आहेत. या पाचपैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे.

अमरावतीत भाजपचा महापौर?अमरावती : महापालिकेत ८७ नगरसेवक निवडून आले आहे. यात भाजप २५, काँग्रेस १५, युवा स्वाभिमान पक्ष १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, शिंदेसेना ३, बसप ३, उद्धवसेना २, वंचित बहुजन आघाडी १ सदस्य आहे. यात भाजप, आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान, शिंदेसेना, बसप अशी महायुती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर हे महायुतीचे होतील, असे संकेत आहेत.

नागपूरच्या नावावर उद्यापर्यंत शिक्कामोर्तबनागपूर : येथील महापौरपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. नाव निश्चित करण्यासाठी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर समितीची बैठक झाली. रविवारपर्यंत नाव निश्चित केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६MayorमहापौरMaharashtraमहाराष्ट्रMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका