मुनगंटीवारांची तिरुपती वारी वादात!

By Admin | Updated: December 11, 2014 01:42 IST2014-12-11T01:42:58+5:302014-12-11T01:42:58+5:30

राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सहकुटुंब तिरुपती वारी चांगलीच वादात सापडली आहे.

Mungantiwar's Tirupati Vari | मुनगंटीवारांची तिरुपती वारी वादात!

मुनगंटीवारांची तिरुपती वारी वादात!

मुख्यमंत्र्यांकडून समर्थन : विरोधकांची टीका
नागपूर : राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सहकुटुंब तिरुपती वारी चांगलीच वादात सापडली आहे. विमान प्रवासात गोसीखुर्द प्रकल्पातील एक बडा कंत्रटदार सहप्रवासी असल्याने या विमान वारीचे ‘बिल’ कोणी अदा केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मुनगंटीवारांच्या विमान प्रवासाचे भाडे भाजपाने भरल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रय} केला.
 शनिवारी रात्री मुंबईहून एका खासगी विमानाने मंत्री मुनगंटीवार नागपूरला गेले. रविवारी तिथून ते सहकुटुंब तिरुपतीला गेले. त्यांच्यासमवेत तेलगू देसमचे आमदार आणि सिंचन कंत्रटदार रामा राव होते. रामा राव यांनीच मुनगंटीवार यांची तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त पदासाठी शिफारस केल्याची चर्चा आहे. या वारीवर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी टीका केली. 
 
मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
मुनगंटीवार यांच्या विमान प्रवासाचे पैसे भाजपाने दिले असून त्यांच्या विमान प्रवासात काही गैर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे समर्थन केले. मुनगंटीवार यांना तातडीने विधिमंडळात यायचे असल्याने अपवादात्मक बाब म्हणून पक्षाने त्यांना ही सवलत उपलब्ध करून दिली, असेही फडणवीस म्हणाले.
 
आपल्या बदनामीचा कट - मुनगंटीवार
च्गेली 15 वर्षे 8 डिसेंबर रोजी आपण तिरुपतीला जात आहोत. या वर्षी विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार होते व आपल्याला अर्थमंत्री या नात्याने पुरवणी मागण्या मांडायच्या होत्या. 
च्त्यामुळे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाच्यावतीने विमानसेवा उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यांनी ती आपल्याला उपलब्ध करून दिली. 
च्या आपल्या दौ:याचा खर्च पक्षाने केला आहे. तेलगू देसमचे आमदार रामा राव व आपला संबंध जोडणो हा आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
 
राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सहकुटुंब तिरुपती वारी चांगलीच वादात सापडली आहे.

 

Web Title: Mungantiwar's Tirupati Vari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.