मुंडे मृत्यू खटल्याची सुनावणी एप्रिलमध्ये

By Admin | Updated: January 15, 2015 04:51 IST2015-01-15T04:51:47+5:302015-01-15T04:51:47+5:30

ज्येष्ठ भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू ज्या मोटारीने जोरदार ठोकर दिल्याने झाला, त्या मोटारीच्या

Munde's death trial in April | मुंडे मृत्यू खटल्याची सुनावणी एप्रिलमध्ये

मुंडे मृत्यू खटल्याची सुनावणी एप्रिलमध्ये

नवी दिल्ली : ज्येष्ठ भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू ज्या मोटारीने जोरदार ठोकर दिल्याने झाला, त्या मोटारीच्या चालकाविरुद्ध केंद्रीय गुप्तचर (सीबीआय) विभागाने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात येत्या ८ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
मुंडे यांच्या मोटारीवर जी इंडिका मोटार समोरून आदळली, तिचा चालक गुरविंदर सिंग हा न्यायालयाने बजावलेल्या समन्सनुसार मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांच्या न्यायालयात हजर झाला. त्याला खटल्याच्या कागदपत्रांच्या प्रती दिल्यानंतर न्यायालयाने खटल्याच्या सुनावणीस ८ एप्रिल ही तारीख निश्चित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Munde's death trial in April