मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
By Admin | Updated: July 10, 2016 15:30 IST2016-07-10T15:30:54+5:302016-07-10T15:30:54+5:30
पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला.

मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला
ऑनलाइन लोकमत
पाथर्डी, दि. १० - ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडची जलसंधारण व रोजगार हमी योजनेची खाती काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाथर्डी शहरातील नाईक चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा युवक भाजपाचे कार्यकर्ते व मुंडे समर्थकांनी जाळला.
यावेळी भाजपाचे युवामोर्चांचे शहराध्यक्ष मुकुंद गर्जे,गोकुळ दौंड,पप्पू बनसोड,पंचायत समिती माजी सभापती संपत कीर्तने आदि सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खातेवाटपानंतर लगेचच पंकजा मुंडेंनी टि्वटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती.
सिंगापूरमध्ये होणा-या वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण मिळाले होते. पण आता मी त्या खात्याची मंत्री राहिली नसल्याने उपस्थित राहू शकणार नाही असे टि्वट पंकजा मुंडेंनी केले होते.
त्याला मुख्यमंत्र्यांनीही लगेच उत्तर दिले होते. पंकजा मुंडे यांनी वरिष्ठमंत्री या नात्याने सरकारच्या प्रतिनिधी म्हणून वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहीले पाहिजे असे म्हटले होते.