मुंडे समर्थकांना संपविण्याचा डाव
By Admin | Updated: September 29, 2014 07:30 IST2014-09-29T07:30:15+5:302014-09-29T07:30:15+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आड भाजपाच असून, बहुजन समाजाचे नायक गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न हे पक्षातील जातीयवादी लोक करीत आहेत

मुंडे समर्थकांना संपविण्याचा डाव
कवठे महांकाळ (जि. सांगली) : धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आड भाजपाच असून, बहुजन समाजाचे नायक गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना खिंडीत गाठण्याचे प्रयत्न हे पक्षातील जातीयवादी लोक करीत आहेत, असा आरोप आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
एका महिन्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालात काढतो म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायलाही तयार नाहीत, असे सांगून ते म्हणाले, मुंडे यांच्या मृत्यूच्या सीबीआय चौकशीची मागणी केल्यामुळे पक्षातील मुंडे समर्थकांचे राजकीय आयुष्य संपविण्याचा उद्योग सुरू आहे. त्यातूनच आपले आणि संभाजी पवार यांचे तिकीट कापले.
मात्र बहुजनांचे राजकारण मोडण्याचा भाजपाचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठीच आणि भाजपासारख्या जातीयवादी पक्षाला गाडण्यासाठी आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, असेही शेंडगे म्हणाले. (वार्ताहर)