मुंडे..भाजपमधील बहुजनांचा आवाज

By Admin | Updated: June 4, 2014 01:15 IST2014-06-04T01:15:35+5:302014-06-04T01:15:35+5:30

भाजपमधील बहुजन समाजातील सच्चे कार्यकर्ते आणि नेत्यांचा गोपीनाथ मुंडे हे आधार होते. अडीअडचणींच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची सवय कार्यकर्त्यांंंंंना प्रोत्साहन आणि उत्साह

Munde .. Bijapani's voice in BJP | मुंडे..भाजपमधील बहुजनांचा आवाज

मुंडे..भाजपमधील बहुजनांचा आवाज

विनोद गुडधे पाटील
नागपूर: भाजपमधील बहुजन समाजातील सच्चे कार्यकर्ते आणि नेत्यांचा गोपीनाथ मुंडे हे आधार होते. अडीअडचणींच्या काळात  मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची सवय कार्यकर्त्यांंंंंना प्रोत्साहन आणि उत्साह निर्माण करणारी होती. सकाळी त्यांच्या निधनाची  बातमी कळली तेंव्हा विश्‍वासच बसत नव्हता. तत्त्काळ टीव्ही सुरू केला. दुर्दैवाने बातमी खरी होती. मुंडेंच्या अशा अकाली  जाण्याचा धक्काच बसला. भारतीय जनता पक्षाला बहुजनांचा चेहरा देणारा नेता हरपल्याचे अतीव दु:ख झाले. भाजप हा  भट-ब्राह्मणांचा पक्ष अशी प्रतिमा असण्याच्या काळात माझ्यासह राज्यातील इतरही भागातील जे काही बहुजन समाजातील  कार्यकर्ते या पक्षाच्या वाढीसाठी झटत होते त्यापैकीच एक मुंडे होते. पहिल्याच भेटीत आपलसं करण्याची शैली त्यांच्याकडे होती.  १९८0 मध्ये मुंबईतील बांद्रा येथे त्यांची आणि माझी प्रथम भेट झाली त्यानंतर सलग दहा वर्षे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी  मिळाली. पहिल्या भेटीतच त्यांनी  मला आपलसं केलं. मी प्रथम नगरसेवक झालो तेंव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्यासोबत  विधिमंडळातही काम करण्याची संधी मिळाली. विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताना सर्वांंंंंना सोबत घेऊन  जाण्याची शैली  वाखणण्याजोगी होती. युतीची सत्ता आल्यावर ते उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे गृह खाते होते. आमदारांना स्वसंरक्षणासाठी  त्यांनी रिव्हॉल्व्हर देण्याचा प्रस्ताव होता. मात्र मला शस्त्र परवाना नाकारण्यात आला. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो. इतरांना  परवाने देता व मला का नाही, असे मी त्यांना विचारले. त्यावर ते म्हणाले ‘‘ विनोद तुझा स्वभाव तापट आहे आणि म्हणून मी तुला  परवाना देणार नाही’’ सुरुवातीला मुंडेंचा हा तर्क पटला नाही. पण कालांतराने अशा  काही घटना घडल्या की त्यांनी घेतलेला  निर्णय किती योग्य होता याची खात्री पटली. त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय यातून आला.
 

Web Title: Munde .. Bijapani's voice in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.