फडणवीसांना होणारी अटक मुंडेंनी भुजबळांच्या मदतीने टाळली - अनिल परब
By Admin | Updated: February 25, 2017 17:12 IST2017-02-25T17:12:54+5:302017-02-25T17:12:54+5:30
नागपूर महापालिका घोटाळा प्रकरणात तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांना अटक होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडेंनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांकडे प्रयत्न केले

फडणवीसांना होणारी अटक मुंडेंनी भुजबळांच्या मदतीने टाळली - अनिल परब
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - 'नागपूर महापालिका घोटाळा प्रकरणात तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांना अटक होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडेंनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळांकडे प्रयत्न केले', असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला आहे. घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना अटक होणार होती असा दावा त्यांनी केला आहे. एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र पुढे बोलताना 'त्यावेळी ही ची चर्चा होती, ते खरं की खोटं मला माहीत नाही', अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
'नंदलाल समितीच्या अहवालात देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे, यावर मी आजही ठाम असल्याचं', अनिल परब बोलले आहेत. 'भुजबळांनी फडणवीसांना वाचवलं, मात्र त्याची परतफेड म्हणून त्यांनी भुजबळांनाच आत टाकलं', असा टोलाही अनिल परब यांनी लगावला.