शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा दुर्घटना नेमकी घडली कशी? रेल्वेची चौकशी समिती घेणार कारणांचा शोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:14 IST

Mumbra Train Accident: मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांचा समावेश आहे.  

मुंबई -  मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीमध्ये ज्युनिअर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अधिकारी, वरिष्ठ विभागीय ऑपरेशन्स मॅनेजर, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांचा समावेश आहे.  

या दुर्घटनेचे नेमके कारण हे शोधण्याबरोबरच तिची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ही पाच सदस्यीय समिती उपाययोजना सुचविणार आहे. ही समिती रेल्वे महाव्यवस्थापक यांच्या निगराणीत काम करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली, याची माहिती रेल्वे देऊ शकत नाही. ते एक कोडेच आहे.

नेमक्या कोणत्या ट्रेनमधून प्रवासी पडले?मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी वेगाने येणाऱ्या दोन लोकल ट्रेनमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले. ही घटना सकाळी ८:५८  वाजता कल्याण दिशेकडील एका तीव्र वळणावर घडली. मुंब्राजवळ सीएसएमटीला जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून आठ प्रवासी पडले. त्यानंतर काही वेळातच, चेन खेचल्यामुळे ठाणे स्थानकावर तीच ट्रेन थांबली तेव्हा आणखी पाच प्रवासी जखमी अवस्थेत आढळले. त्यामुळे नेमके काय झाले, याचा शोध रेल्वेची चौकशी समिती घेणार आहे. 

चौकशीसाठी मुद्दे...  ही दुर्घटना कशी घडली?  प्रवाशांमध्ये काही भांडणे झाली होती का? दोन ट्रेनमधील प्रवासी वळणावर एकमेकांवर घासले गेले का? प्रवासी लटकत होते. त्यामुळे बॅग घासून ते पडले का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न समिती करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मुंब्र्यातील दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. दुर्घटनेमागील कारणाचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून संभाव्य अपघात टाळण्याच्या उपाययोजनांवरही विचार करण्यात येणार आहे. या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.  - डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेmumbraमुंब्राAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे