मुंबापूर !
By Admin | Updated: June 19, 2015 22:47 IST2015-06-19T22:47:48+5:302015-06-19T22:47:48+5:30
चोवीस तासांपासून सातत्याने तुफान बरसणाऱ्या धारा... दर्याला आलेले उधाण... मिठी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी... अशा स्थितीने मुंबापुरीचे रूप अक्षरश:

मुंबापूर !
मुंबई ठप्प : चोवीस तास मुसळधार; जून महिन्यातील सरासरीचा नवा विक्रम, आज शाळा बंद
मुंबई : चोवीस तासांपासून सातत्याने तुफान बरसणाऱ्या धारा... दर्याला आलेले उधाण... मिठी नदीने ओलांडलेली धोक्याची पातळी... अशा स्थितीने मुंबापुरीचे रूप अक्षरश: ‘मुंबापूर’ असे करून टाकले. तुंबलेले नाले, जलमय झालेले रस्ते तसेच रेल्वे ट्रॅक हे रूप नवे नसले तरी ही स्थिती करोडो मुंबईकरांच्या मनाला २६ जुलैच्या त्याच भयाचा स्पर्श करून गेली. मुख्य म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार नाही ही पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीची वल्गना अक्षरश: एका सरीत वाहून गेली. अर्थात स्वत: नखशिखांत भिजल्यानंतर पावसालाही छत्रीत घेण्याचे औदार्य दाखवणाऱ्या मुंबईकरांनी या पूरस्थितीचाही पुरेपूर आनंद लुटला.
मिठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काठावरील रहिवाशांना जवळच्या शाळांत स्थलांतरित करण्यात आले.
साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यास पालिका प्रशासनातर्फे २६२ पंप लावण्यात आले. त्यापैकी १७० पंप कार्यान्वित करण्यात आले.
दोघांचा मृत्यू
वडाळ्यातील इमारत क्रमांक ११ येथे इलेक्ट्रिक शॉक लागल्याने रणजीत कुमार गुप्ता (६०) आणि कर्णिक गौरव धामीर (५) या दोघांचा मृत्यू झाला.
खबरदारीचा उपाय म्हणून नौदल महापालिका प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या संपर्कात होते. मदतीसाठी कुलाबा येथे ‘सी किंग’ हेलिकॉप्टर सज्ज होते.
रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे प्रवाशांची लूटही चालविली. बेस्टने मारत्र आपली सेवा अविरतपणे दिली.
दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील ८० टक्के बाजार बंद होता. त्यामुळे ५०० कोटींचा तोटा
10 तासांहून अधिक काळ लोकलही कोलमडली.
20 जून रोजी दुपारी ३:१० वा. भरती, ४.३३ मीटर उंच लाटा उसळतील.
24तासांत जोरदार पावसाची शक्यता
रस्ते ठप्प... पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्ग, आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री व सायन-पनवेल मार्ग पावसामुळे ठप्प.
मेट्रो दहा मिनिटे विलंबाने धावत होती.
येथे साचले पाणी
मुंबई सेंट्रल, हिंदमाता, गांधी मार्केट, वडाळा, हिंदू कॉलनी, माटुंगा स्थानक, अॅन्टॉप, वरळी, मुलुंड, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द, वांद्रे, सांताक्रूझ, खार, अंधेरी, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरीवली.