मुंंबईसह कोकणात जिवाची काहिली!
By Admin | Updated: February 18, 2017 04:14 IST2017-02-18T04:14:26+5:302017-02-18T04:14:26+5:30
गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी महाराष्ट्र तापला आहे. शुक्रवारीही पारा चढाच होता.

मुंंबईसह कोकणात जिवाची काहिली!
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असून उन्हाच्या तीव्र झळांनी महाराष्ट्र तापला आहे. शुक्रवारीही पारा चढाच होता. विशेषत: कोकण किनारपट्टीतील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
मुंबईसह कोकण, गोव्याच्या किमान व कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे़ कोकणातील अनेक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ ते ८ अंशाने वाढ झाली आहे़ किमान तापमानातही ५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे़
मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशाच्या आसपास असून ऐन दुपारी ऊन्हाचा चांगलाच कडाका असून, उष्ण वारेही वाहत असल्याने मुंबईकरांच्या जिवाची काहिली होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३८़९ अंश सेल्सिअस तर, सर्वांत कमी तापमान अहमदनगर येथे १२़९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे़ मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खान्देश तसेच विदर्भातील काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३२़२, जळगाव ३५, महाबळेश्वर २८़१, मालेगाव ३६़२़, नाशिक ३२़६, सांगली ३४़६, सातारा ३३़५, मुंबई ३७़५, अलिबाग ३५़६, रत्नागिरी ३८़९, पणजी ३४़५, डहाणू ३६़६, उस्मानाबाद ३३़४, औरंगाबाद ३४़२, परभणी ३४़५, बीड ३३़६, अकोला ३६़८, अमरावती ३४़६, बुलढाणा ३४़५, ब्रम्हपुरी ३६़१, चंद्रपूर ३५़४, गोंदिया ३३़२, नागपूर ३३़९, वाशिम ३१़२, वर्धा ३५, यवतमाळ ३४़ (प्रतिनिधी)