मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई - नितेश राणेंचा सवाल
By Admin | Updated: July 12, 2016 15:34 IST2016-07-12T15:17:19+5:302016-07-12T15:34:03+5:30
'मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई?' असा सवाल विचारत काँग्रेस आमदार नितेश राणें यांनी मुंबईतल्या विविध खड्डयांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार भवनमध्ये भरवले आहे.

मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई - नितेश राणेंचा सवाल
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - पावसाळा सुरू होऊन महिना उलटून गेला तरी मुंबईकरांची अद्याप खड्ड्यांच्या समस्येतून सुटका झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर 'मुंबईत खड्डे की खड्ड्यांत मुंबई?' असा सवाल विचारत काँग्रेस आमदार नितेश राणें यांनी मुंबईतल्या विविध खड्डयांचे प्रदर्शन मुंबई मराठी पत्रकार भवनमध्ये भरवले आहे.
मुंबई महानगरपालिकेने फक्त 66 खड्डे असल्याचे जाहीर केले होते, पण आमदार नितेश राणे तब्बल 450 खड्डयांचे छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून पालिकेचे सर्व दावे फोल ठरवले आहेत.
मुंबईतील खड्ड्यांची खरी परिस्थिती आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. मुंबई महापालिकेचे आयुक्त असो वा सत्ताधारी नेते, खड्ड्यांच्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप करतात,मात्र खरी परिस्थिती काय आहे, हे आम्ही या प्रदर्शनातून दाखवत आहोत, असे नितेश राणेंनी सांगितले.