शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 11:30 IST

महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क,मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील प्रचंड विकासकामांमुळे लोकांना दिलासा मिळत आहे. आता महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे. आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला.

शाह यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम यांची एक तास बैठक घेतली.मुंबई महापालिकेत लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व तुमच्याकडे आहे. मुंबईच्या विकासासाठी केंद्र सरकार पाठीशी आहे.   ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे त्यापेक्षा मजबूत नेटवर्क तुमच्याकडे असले पाहिजे, असेही शाह यांनी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

प्रचारात देशभरातील नेतेशाह यांनी नेत्यांची महापालिका निवडणुकीबाबत मते जाणून घेतली. विधानसभेआधी केंद्रीय भाजपने महाराष्ट्रात विविध राज्यांमधील नेत्यांना पाठविले होते. त्यात केंद्रीय मंत्रीही होते.मुंबईचे बहुभाषिक स्वरूप पाहता उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि दक्षिणेतील राज्यांमधील काही नेत्यांना महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईत पाठविले जाईल. प्रचार यंत्रणेला ते सहकार्य करतील. आजच्या बैठकीत या संदर्भातही चर्चा झाल्याचे समजते.

कानपिचक्याही दिल्यासाधारणत: जानेवारी २०२६ मध्ये मुंबईसह इतर महापालिकांची निवडणूक होईल, असा अंदाज आहे.   जबाबदाऱ्यांचे वाटप आतापासूनच करा. मुंबई महापालिका जिंकणे हे आपले मुख्य उद्दिष्ट आहे. त्यावरच मुंबईतील पक्षाच्या प्रत्येक नेत्याचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल हे लक्षात ठेवा अशा कानपिचक्याही शाह यांनी दिल्याचे समजते. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेGanesh Chaturthiगणेश चतुर्थी