मुंबईकर वाढत्या उकाड्याने हैराण!
By Admin | Updated: May 14, 2015 02:50 IST2015-05-14T02:50:52+5:302015-05-14T02:50:52+5:30
देशासह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईकर मात्र उकाड्याने कमालीचे हैराण झाले आहेत.

मुंबईकर वाढत्या उकाड्याने हैराण!
मुंबई : देशासह राज्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा धिंगाणा सुरू असतानाच मुंबईकर मात्र उकाड्याने कमालीचे हैराण झाले आहेत. शहराचे कमाल तापमान ३४ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत आहे. मात्र आर्द्रतेमधील वाढीने मुंबईकरांचा चांगलाच घाम निघत आहे.
मागील १० दिवसांपासून शहराची आर्द्रता ७५ ते ९० टक्क्यांच्या आसपास आहे. शिवाय शहरात दिवसा वाहणारे तप्त वारे मुंबईकरांच्या घशाला कोरड पाडत आहेत. (प्रतिनिधी)