मुुंबईकरांना पावसाने झोडपले
By Admin | Updated: September 1, 2014 04:11 IST2014-09-01T04:11:27+5:302014-09-01T04:11:27+5:30
कधी नव्हे ते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि शहरासह उपनगरांना शनिवारच्या रात्रीसह रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले

मुुंबईकरांना पावसाने झोडपले
मुंबई : कधी नव्हे ते हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि शहरासह उपनगरांना शनिवारच्या रात्रीसह रविवारी दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. रविवारची सुटी असल्याने मुंबईच्या रस्त्यांवर कमी गर्दी असली तरी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भक्तांचे मात्र या पावसाने चांगलेच हाल झाले.
गेल्या सोमवारपासून गुरुवारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांत चांगलेच ऊन होते. मात्र त्यानंतर उत्तर आणि दक्षिणेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईत जोरदार सरी कोसळल्या. शुक्रवारी कुठे तरी बरसलेला हा पाऊस शनिवार-रविवारी दमदार बरसला. रविवारी दिवसभर दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर होता. दक्षिण आणि मध्य मुंबईला शनिवार-रविवारी दिवसभर झोडपून काढले; तर पूर्व उपनगरांतही रविवारी सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सायंकाळी विश्रांती घेतली. (प्रतिनिधी)