फायर सेफ्टी ऑडिटबाबत मुंबईकर अज्ञानी

By Admin | Updated: July 22, 2014 01:11 IST2014-07-22T01:11:14+5:302014-07-22T01:11:14+5:30

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केम्स कॉर्नर येथील उत्तुंग इमारतीमध्ये आगीचा भडका उडाला होता़

Mumbaikar ignorant about fire safety audit | फायर सेफ्टी ऑडिटबाबत मुंबईकर अज्ञानी

फायर सेफ्टी ऑडिटबाबत मुंबईकर अज्ञानी

मुंबई : गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात केम्स कॉर्नर येथील उत्तुंग इमारतीमध्ये आगीचा भडका उडाला होता़ याच दुर्घटनेची पुनरावृत्ती अंधेरीत शुक्रवारी घडली़ मात्र जीवाचा धोका आणि कायद्याचा धाक दाखवूनही मुंबईतील 95 टक्के इमारती फायर सेफ्टी ऑडिट नियमित करीत नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आह़े 
यापूर्वी सातवा मजला म्हणजे शेवटचा ठरत होता़ मात्र शहराचा झपाटय़ाने विकास होत गेल्यामुळे आज उत्तुंग इमारतींनी चारशे फुटांर्पयत मजल गाठली आह़े अशा इमारतींमध्ये आलिशान फ्लॅट असले तरी तेथील अग्निरोधक यंत्रणा मात्र शोभेच्या ठरत आहेत़ यामुळे या इमारतींमध्ये आगीचा भडका उडाल्यास त्याची तीव्रता वाढली आह़े
अग्निशमन दलाची यंत्रणाही या इमारतींच्या उंचीपुढे तोकडी पडत असल्याने फायर ऑडिट सक्तीचे करण्यात आल़े महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा कायद्यांतर्गत प्रत्येक सहा महिन्यांनी इमारतीमधील अग्नी सुरक्षेचे ऑडिट बंधनकारक करण्यात आल़े परंतु नोटीस पाठवूनही उत्तुंग इमारतीमधील रहिवासी शहाणो होत नसल्याने अग्निशमन दलाची डोकेदुखी वाढली आह़े (प्रतिनिधी)
 
पालिका घेणार जनजागृती मोहीम
च्कायद्यानुसार फायर ऑडिट न करणा:या इमारतींवर फौजदारी खटला दाखल होऊ शकतो़ पण असे केल्यास जवळपास सर्वच इमारतींवर खटले दाखल करावे लागतील़ 
च्त्यामुळे पालिका लवकरच ऑडिटबाबत जनजागृतीवर भर देणार असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केल़े
 
6क् च्या दशकातील कम्युनिकेशन
च्अग्निशमन दलामार्फत वापरण्यात येणा:या कम्युनिकेशन सिस्टम 196क् च्या दशकातील आहेत़ ही यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी पाच वर्षापूर्वी योजना आणण्यात आली होती़ अग्निशमन दलाकडे दोनशे वॉकीटॉकी आहेत़ 
च्मात्र यामध्ये समोरच्या व्यक्तीचे बोलून झाल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला संदेश देता येत नाही़ मदतकार्यादरम्यान ही मोठी अडचण ठरत असल्याचे एका अग्निशमन अधिका:याने सांगितल़े
 
1खासगी इमारतींमधील फायर सेफ्टी ऑडिटसाठी 315 एजन्सी शासनाने नेमल्या आहेत़ इमारतीतील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित असल्याचे प्रमाणपत्र प्रत्येक इमारतीने दर सहा महिन्यांनी अग्निशमन दलास सादर करणो बंधनकारक आह़े परंतु 95 टक्के इमारती फायर सेफ्टी ऑडिट करीत नसल्याचे एका अग्निशमन अधिका:याने सांगितल़े
 
2पालिकेमार्फत मॉल्स, मल्टिप्लेक्स, रुग्णालय अशा वर्दळीच्या ठिकाणांचे ऑडिट केले जात़े त्यानुसार 31 मार्चर्पयत तीन हजार 469 इमारतींची तपासणी झाली़ यापैकी 1357 इमारतींना अग्निशमन दलाने नोटीस बजावली़ त्यानुसार आवश्यक बदल करण्यास 12क् दिवसांची मुदत देण्यात आली आह़े तर चार इमारतींविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्यात आला आह़े
 
3डिसेंबर 2क्13 मध्ये केम्स कॉर्नर येथील 26 मजल्यांच्या मॉन्ट ब्लँक इमारतीच्या 12 व्या मजल्यावर आगीचा भडका उडाला होता़ या आगीत पाच रहिवासी मृत्युमुखी पडल़े तसेच पाच अग्निशमन जवानही जखमी झाले होत़े

 

Web Title: Mumbaikar ignorant about fire safety audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.