मुंबईकर थंडीने कुडकुडले
By Admin | Updated: December 16, 2014 03:46 IST2014-12-16T03:46:32+5:302014-12-16T03:46:32+5:30
मुंबई शहराचे किमान तापमान सोमवारी १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आणि रात्रीसह दिवसादेखील वाहणाऱ्या थंड

मुंबईकर थंडीने कुडकुडले
मुंबई : मुंबई शहराचे किमान तापमान सोमवारी १२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आणि रात्रीसह दिवसादेखील वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईकर कुडकुडले. राज्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यान नाशिकचे किमान तापमानदेखील ६.३ अंश नोंदविण्यात आले असून, थंडीच्या मोसमात डिसेंबर महिन्यात मुंबईसह नाशिकमध्ये नोंदविण्यात आलेला हा किमान तापमानाचा या वर्षीचा आतापर्यंतचा नीचांक आहे.
मध्य प्रदेशासह अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यासह मुंबईत अवकाळी पाऊस बरसला. विशेषत: मुंबई वगळता बुधवारी आणि गुरुवारी राज्यात ठिकठिकाणी बरसलेल्या पावसासह वातावरणात झालेल्या बदलामुळे किमान तापमानात काही अंशी वाढ झाली. शिवाय मुंबईनजीकच्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे झालेल्या वातावरणीय बदलाचा विपरीत परिणाम म्हणून किमान तापमानात वाढ झाली. गुरुवारसह शुक्रवारी शहराचे किमान तापमान २३ अंश एवढे नोंदविण्यात आले. (प्रतिनिधी)