मुंबई जागतिक दर्जाचे बनविणार - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: June 2, 2014 05:16 IST2014-06-02T05:16:54+5:302014-06-02T05:16:54+5:30
दिल्लीत पडून असलेल्या मुंबईच्या प्रश्नांची सोडवणूक करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला

मुंबई जागतिक दर्जाचे बनविणार - उद्धव ठाकरे
मुंबई : दिल्लीत पडून असलेल्या मुंबईच्या प्रश्नांची सोडवणूक करून मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवू, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचा विजय साजरा करण्यासाठी अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या १८ तसेच भाजपाच्या तीन खासदारांचा सत्कार करण्यात आला. मुंबईचे अनेक प्रश्न दिल्लीत प्रलंबित आहेत. सागरी मार्ग, सिंचनाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. आता केंद्रात सत्ता आल्यामुळे या प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे ठाकरेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या निकालातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन झाले. मात्र त्यांचे स्वप्न अजून साकार झालेले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकवून त्यांचे आशीर्वाद मिळवा. त्यांच्या आशीर्वादाची ताकद दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेच्या विजयात युवा सेनेचाही मोठा वाटा होता, असेही त्यांनी नमूद केले. संतांना साजेसे वर्तन ठेवा, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, असा सल्ला त्यांनी नव्या खासदारांना दिला. कार्यक्रमात अनेक मराठी कलाकार सहभागी झाले होते. आदेश बांदेकर, गिरीश ओक, पल्लवी जोशी, अमोल कोल्हे, तुषार दळवी यांनी सूत्रसंचालन केले.