दमणगंगा, पिंजाळमधून मिळणार मुंबईला पाणी
By Admin | Updated: November 21, 2014 02:54 IST2014-11-21T02:54:01+5:302014-11-21T02:54:01+5:30
मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून

दमणगंगा, पिंजाळमधून मिळणार मुंबईला पाणी
नवी दिल्ली : मुंबईला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना यश आले असून, दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईसाठी पाणी पुरवठा योजनेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. प्रकल्पाचा खर्च अवाढव्य असल्याने तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्याची मागणी खडसे यांनी केंद्राकडे केली. दोन वर्षांत प्रकल्प मार्गी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दमणगंगा व पिंजाळ नदीतून मुंबईला ४० टीएमसी पाणी पुरवण्याची मागणी राज्याने केली होती. त्याबाबतच्या अहवालाला केंद्राने तत्त्वत: मान्यता दिल्याचे खडसे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘केंद्राने ४० टीएमसीला मान्यता दिली. दोन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, या दोन नद्यांसह आजूबाजूच्या आठ नद्या जोडून प्रकल्प सक्षम करण्याची गरज आहे. हा प्रकल्प १२०० कोटींचा असून, प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता त्याला राष्ट्रीय प्रकल्प असा दर्जा द्यावा, अशी मागणी गुरूवारी राजधानीत जलसंधारणमंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत झालेल्या जलमंथन कार्यशाळेत केली. (विशेष प्रतिनिधी)