मुंबई विद्यापीठ इंडियन सायन्ससाठी सज्ज
By Admin | Updated: December 25, 2014 02:15 IST2014-12-25T02:15:53+5:302014-12-25T02:15:53+5:30
शतकपूर्ती झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यंदाचे यजमानपद मुंबई विद्यापीठाला लाभले असून, विद्यापीठ प्रशासन या भव्य कार्यक्रमासाठी सज्ज झाले

मुंबई विद्यापीठ इंडियन सायन्ससाठी सज्ज
मुंबई : शतकपूर्ती झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसचे यंदाचे यजमानपद मुंबई विद्यापीठाला लाभले असून, विद्यापीठ प्रशासन या भव्य कार्यक्रमासाठी सज्ज झाले आहे. विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये ३ ते ७ जानेवारीदरम्यान पार पडणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ११ नोबेल पारितोषिक विजेत्यांसह १२ हजारांहून अधिक वैज्ञानिक सहभागी होणार आहेत.
मानवी विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी फॉर ह्युमन डेव्हलपमेंट) ही या वेळच्या सायन्स काँग्रेसची थीम आहे. या विज्ञान परिषदेमध्ये ३२ सिंपोझिया आणि १४ सेशन्स असणार आहेत, ज्यामध्ये अॅग्रिकल्चर अॅण्ड फोरेस्ट्री सायन्स, अॅनिमल, व्हेटर्नरी अॅण्ड फिशरी सायन्स, एन्थ्रोपॉलॉजी अॅण्ड बिहेवियर सायन्स, केमिकल सायन्स, अर्थ सिस्टीम सायन्स, इंजिनीअरिंग सायन्स, एन्व्हायर्नमेंट सायन्स, इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, मटेरीअल सायन्स, मॅथेमेटिकल सायन्स, न्यू बॉयोलॉजी, फिजिकल सायन्स, प्लांट सायन्स असे १४ विभाग आहेत. तसेच ३२ सिंपोझिया असणार आहेत. ज्यामध्ये देश-विदेशातील जवळपास १५० हून अधिक वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेत राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलन, विज्ञान संचारक संमेलन, भव्य विज्ञान परिषद, वूमन सायन्स काँग्रेस आदी कार्यक्रमांचेही आयोजित केले आहे. राष्ट्रीय किशोर वैज्ञानिक संमेलनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर वैज्ञानिक प्रदर्शन भरविले आहे.
विज्ञान परिषदेत सहभागी होण्यासाठी सुमारे ९ हजार ५00 विज्ञानप्रेमींनी परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली आहे. यामध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळंकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ५४ वर्षांनी मुंबई विद्यापीठाला विज्ञान परिषदेचा बहुमान मिळाला
आहे. (प्रतिनिधी)