मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका, 1 महिना ड्रोनवर बंदी
By Admin | Updated: March 29, 2017 22:48 IST2017-03-29T22:48:42+5:302017-03-29T22:48:42+5:30
मुंबईवर हवाई हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता,29 एप्रिलपर्यंत मुंबईत ड्रोन्सवर बंदी

मुंबईवर हवाई हल्ल्याचा धोका, 1 महिना ड्रोनवर बंदी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबईवर हवाई हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यामुळे 29 एप्रिलपर्यंत मुंबईत ड्रोन्सवर बंदी घालण्यात आली आहे.
हवाईमार्गे ड्रोनच्या सहाय्याने किंवा रिमोट कंट्रोल एरियल मिसाइल, पॅराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्टच्या सहाय्याने मुंबईला लक्ष्य केलं जाऊ शकतं. संभाव्य धोका लक्षात घेऊन खबरदारी घेत असल्याचं मुंबई पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितलं आहे.
ऑपरेशन विभागाच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप-देवधर यांनी ड्रोनबंदीचे आदेश काढले आहेत. मुंबईवर हवाई हल्ल्याच्या शक्यतेमुळे गुप्तचर यंत्रणांसह दहशतवादविरोधी पथक सज्ज झाले आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
मुंबई पोलिसांनी जुलै 2015 मध्येही अशाप्रकारे एक महिन्यासाठी ड्रोनवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकदा तशाच प्रकारचं पाऊल उचलण्यात आलं आहे.