मुंबई: आजाराला कंटाळून जेष्ठ नागरिकाची आत्महत्या
By Admin | Updated: June 7, 2017 22:07 IST2017-06-07T22:07:23+5:302017-06-07T22:07:23+5:30
आजाराला कंटाळून एका जेष्ट नागरिकाने उडी मारुन आत्महत्या करण्याची घटना काळाचौकी येथील अरम टॉवरमध्ये घडली.

मुंबई: आजाराला कंटाळून जेष्ठ नागरिकाची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.7 - आजाराला कंटाळून एका जेष्ट नागरिकाने उडी मारुन आत्महत्या करण्याची घटना काळाचौकी येथील अरम टॉवरमध्ये घडली. जयंत अमरचंद सेठ (वय ६२) असे त्याचे नाव असून आपल्या या कृत्यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये, अशी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती.
जयंत यांच्यावर काही दिवसापूर्वी घस्याची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून ते वैफल्यग्रस्त अवस्थेत होते. त्यामुळे त्यांनी रहात्या फ्लॅटच्या गॅलरीतून खाली उडी मारली. उंचावरुन पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच ठार झाले.आत्महत्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. याप्रकरणी कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.