शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

मुंबईला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 01:57 IST

रविवारी सुटी घेतलेल्या पावसाने सोमवारी मात्र रौद्ररूप धारण केले आणि मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, रायगडला सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रविवारी सुटी घेतलेल्या पावसाने सोमवारी मात्र रौद्ररूप धारण केले आणि मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, रायगडला सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून काढले. मुंबईत प्रामुख्याने कुलाबा, घाटकोपर आणि गोरेगाव येथे मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने दिवसभर आपला मारा कायम ठेवला होता. त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि लालबहादूर शास्त्री मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.सोमवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईवर सरींचा वर्षाव सुरू केला. कुलाबा, घाटकोपर आणि गोरगाव परिसरात सकाळच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळनंतर दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र सायंकाळी पुन्हा रौद्ररूप धारण केलेल्या जलधारांनी भांडुप, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, लालबाग, भायखळा, फोर्टसह कुलाबा, मरिन ड्राइव्ह, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगावला झोडपून काढले. पावसामुळे शहरात तीन, पश्चिम उपनगरांत दोन अशा एकूण पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात नऊ, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात सात अशी एकूण अठरा ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही. दरम्यान, पावसाचा वेग कायम राहणार असून, येत्या ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.हवामानाचा अंदाज१८ जुलै : कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस१९-२० जुलै : संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता२१ जुलै : कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यतामान्सून अपडेटमान्सून सोमवारी पश्चिम राजस्थानच्या आणखी काही भागात, पूर्व राजस्थानच्या उर्वरित भागात, हरियाणाच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.