मुंबईत राहुल गांधी उभे राहिले एटीएमच्या रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2016 13:10 IST2016-11-16T13:09:35+5:302016-11-16T13:10:22+5:30
नवी दिल्लीतील संसदभवन परिसरात चार हजार रुपये काढण्यासाठी राहुल गांधी एटीएमच्या रांगते उभे राहिल्याची घटना ताजी असताना आता मुंबईत...

मुंबईत राहुल गांधी उभे राहिले एटीएमच्या रांगेत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - नवी दिल्लीतील संसदभवन परिसरात चार हजार रुपये काढण्यासाठी राहुल गांधी एटीएमच्या रांगते उभे राहिल्याची घटना ताजी असताना आता मुंबईत दौ-यातही राहुल गांधी एटीएमच्या रांगेत उभे राहिले. राष्ट्रीय स्वयंसेक संघाच्या अवमानना प्रकरणात भिवंडी कोर्टात हजर होण्यासाठी आलेल्या राहुल गांधी जामिन मिळाल्यानंतर मुंबईत आले.
यावेळी त्यांनी एटीएमच्या रांगेत उभे राहून नागरीकांशी चर्चा केली. यावेळी काही नागरीकांनी आपल्या तक्रारी त्यांच्या कानावर घातल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला त्यामागे कुठलेही नियोजन नाही.
आणखी वाचा
सर्वसामान्य लोकांना या निर्णयाचा त्रास होतोय. रांगेत उभे राहणा-या लोकांसाठी पाण्याची आणि अन्य व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. राहुल गांधी यांच्या या एटीएम भेटीवर भाजपने टीका करताना ही नौटंकी असल्याचे सांगितले.