शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

कर्जत थांबा रद्द करूनही मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस उशिराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 04:28 IST

प्रवाशांचे हाल; पुश-पूल इंजिनानंतरही नियोजित वेळेत पोहोचणे अवघड

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन आणि कर्जत थांबा रद्द करूनदेखील ती उशिराने पोहोचत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. मुंबई ते पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी पूश-पूल इंजीन बसविण्यात आले. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करतेवेळी साधारण ३ तास १५ मिनिटांचा प्रवास, पूश-पूल इंजीन बसविल्याने २ तास ३५ मिनिटांत होण्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला. मात्र १२ जून ते १७ जूनपर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेसला विलंब होत आहे. कर्जत थांबा रद्द केल्याने कर्जतहून पुणे प्रवास करणाºया प्रवाशांचे हाल झाले आहेत.इंटरसिटी एक्सप्रेसला पूश-पूल इंजीन बसविल्याने ३० ते ४० मिनिटांची बचत होणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. पुण्याला इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र चाचणीच्या पहिल्या दिवशी १२ जूनला सकाळी १० वाजून ०६ मिनिटांनी, १३ जूनला सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी, १४ जूनला सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी, १५ जूनला सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी, १६ जूनला सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांनी आणि १७ जूनला सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांनी इंटरसिटी एक्स्प्रेस पुण्याला पोहोचते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे अपेक्षित वेळेच्या १० ते ३६ मिनिटांचा उशीर चाचणीच्या वेळेत झालाआहे.मुंबई ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये गर्दी वाढलीइंटरसिटी एक्स्प्रेसला पूश-पूल इंजीन लावल्याने कर्जतचा तांत्रिक थांबा रद्द केल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. कर्जतहून पुण्याला जाण्यासाठी इंटरसिटी एक्स्प्रेसचा वापर केला जात होता. यातून दररोज तब्बल तीनशेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. मात्र कर्जत थांबा रद्द केल्याने आता इंटरसिटीनंतर येणाºया मुंबई ते पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कर्जत थांबा रद्द केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेKarjatकर्जत