तेलाचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ठप्प

By Admin | Updated: February 20, 2016 10:07 IST2016-02-20T10:07:01+5:302016-02-20T10:07:01+5:30

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर उलटल्यानं येथील दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली असून किमान दोन तास प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.

Mumbai Pune Expressway Junk | तेलाचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ठप्प

तेलाचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ठप्प

 तेलाचा टँकर उलटल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वे ठप्प

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 20 -  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर उलटल्यानं येथील दोन्ही दिशांची वाहतूक ठप्प झाली असून किमान दोन तास प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत.
एक्सप्रेस वेच्या खंडाळा एक्झिटजवळच हा टँकर उलटला आहे.
त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही लेनवर ऑइल पसरलं आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून एक्सप्रेस वेवरील वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक जुन्या मुंबई-पुणे हायवेवर वळविण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे खोपोली आणि लोणावळा भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली आहे.
 
 
वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. खंडाळा पो.स्टे. हद्दीत हा अपघात झाला आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी किमान 2 तासाचा अवधी लागणार आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.
वीकेंड असल्यानं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची अधिक गर्दी असते. त्यातच वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Web Title: Mumbai Pune Expressway Junk