शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Pune Expressway: मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील अपघातामुळे एसटीच्या तब्बल १४० फेऱ्या रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 06:47 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या सुमारे १४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टँकर अपघातामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या २०० पेक्षा जास्त बस अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याचा परिणाम म्हणून बुधवारी सुमारे १४० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून त्याचा फटका प्रवाशांना बसला, तसेच वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांची गैरसोय झाल्याचे त्यांनी सांगितले. 

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी मुंबई सेंट्रल, कुर्ला, परळ डेपोच्या बस १२ ते १४ तासांपेक्षा जास्त उशिराने आल्याने चालक वाहकांच्या ड्यूटीवर त्याचा परिणाम झाला. थकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेसाठी बसवर ड्यूटी लावणे प्रवाशांच्या हिताचे नसल्याने फेऱ्या रद्द केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान वाहतूक सुरळीत होताच बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

ई-शिवनेरीला सर्वाधिक फटका

वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका मुंबई-पुणे या ई-शिवनेरी सेवेवर झाला. दिवसभरात या सेवेच्या ७३ फेऱ्या रद्द केल्या, तर इतर ६६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या.  

बस पनवेलहून परत माघारी

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे वंदना व खोपट आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या. सकाळी ९ वाजता बस स्वारगेटकडे रवाना झाली, मात्र ११ वाजता सुटलेली एसटी पनवेलपर्यंत पोहोचताच महामार्गावरील परिस्थितीची माहिती प्रवाशांना मिळाली. दीर्घकाळ कोंडीत अडकण्याऐवजी परतीचा प्रवास योग्य असल्याची भूमिका प्रवाशांनी घेतली आणि चालक, वाहकाकडे बस परत ठाण्याकडे वळविण्याची विनंती केली. त्यानुसार ती बस पनवेलहून ठाण्यात परत आली. ठाण्यातून दररोज पुण्याकडे एकूण १८ फेऱ्या होतात. बुधवारी १० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai-Pune Expressway Accident: 140 ST Bus Trips Canceled Due to Traffic

Web Summary : A tanker accident on the Mumbai-Pune Expressway caused massive traffic jams, stranding over 200 ST buses. Consequently, 140 trips were canceled, severely inconveniencing passengers. E-Shivneri services were particularly affected, with 73 trips axed. Some buses returned to Thane from Panvel due to the congestion.
टॅग्स :state transportएसटीTrafficवाहतूक कोंडीMumbaiमुंबई