शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे प्रवास होणार आणखी फास्ट, वाचणार अर्धा तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 10:09 IST

एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा वाढवण्याचा विचार सुरू

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हटलं की भरधाव वेगानं धावणाऱ्या गाड्यार डोळ्यासमोर दिसू लागतो. आता या महामार्गावरील प्रवास आणखी वेगवान होण्याची शक्यता आहे. एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा वाढवण्याचा विचार एमएसआरडीसीकडून सुरू आहे. एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा वाढवल्यास राज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक राजधानी यांच्यातील अंतर अर्ध्या तासानं कमी होईल. एमएसआरडीसीकडून वेगमर्यादा वाढवण्याचा विचार सुरू असला तरी यंत्रणांकडून अपघातांचाही विचार केला जात आहे. 2003 मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सुरू झाला. तेव्हापासून आतापर्यंत या 95 किलोमीटरच्या महामार्गावर 5 हजार अपघात झाले आहेत. एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादेचा निर्णय घेण्यासाठी एमएसआरडीसीनं एका समितीची स्थापना केली आहे. यामध्ये गृह, वाहतूक, ऑटोमोबाईल, आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसह एमएसआरडीसीमधील अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्याकडून वेगमर्यादेबद्दलचा अहवाल तयार करण्यात येईल. यानंतर एक्स्प्रेस वेसाठीची नवी वेगमर्यादा निश्चित केली जाईल. वेगमर्यादेबद्दलचा निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेली समिती महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र, अरुंद भाग यांचा विचार करेल. येत्या काही महिन्यांमध्ये या समितीकडून अहवाल सादर केला जाईल. वेगमर्यादा वाढवायची असल्यास अपघात टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक असतील, याची माहितीदेखील समितीकडून दिली जाईल. एप्रिल महिन्यात केंद्रानं महामार्गांची देखभाल करणाऱ्या सर्व यंत्रणांना वेगमर्यादा वाढवण्याची विनंती केली आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा, या उद्देशानं केंद्राकडून ही विनंती करण्यात आली आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे अद्याप एमएसआरडीसीनं एक्स्प्रेस वेवरील वेगमर्यादा 80 किलोमीटर प्रतितासावरुन 100 किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.  

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळ