मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस ब्लॉक’!

By Admin | Updated: January 30, 2015 04:06 IST2015-01-30T04:06:32+5:302015-01-30T04:06:32+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील खंडाळा अमृतांजन पुलाच्या कठड्याला गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास दोन ट्रक धडकून झालेल्या

Mumbai-Pune 'Express Block'! | मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस ब्लॉक’!

मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस ब्लॉक’!

लोणावळा (जि़ पुणे) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील खंडाळा अमृतांजन पुलाच्या कठड्याला गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास दोन ट्रक धडकून झालेल्या विचित्र अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल तीन तास विस्कळीत झाली होती़ अपघातग्रस्त अवजड ट्रक क्रेन व पुलर यंत्राच्या साहाय्याने बाजूला केल्यानंतर साडे अकरा वाजता महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली़
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अवजड ट्रक अमृतांजन पुलाजवळून धीम्या गतीने घाट उतरत असताना मागून भरधाव ट्रेलरने ट्रकला जोरदार धडक दिली़ रस्त्याच्या सुरक्षा कठड्यावर चढत ट्रेलर पुलाच्या खांबाला धडकला तर मागून जोरात धडक बसल्याने अवजड ट्रकही पुलाच्या खांबाला धडकल्याने मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. (वार्ताहर)

Web Title: Mumbai-Pune 'Express Block'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.