शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा चाळीसगावात खून, तलवारीने केले वार, चारजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 22:44 IST

Jalgaon: चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवारी सकाळी झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. मुंबई येथे कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत खून करण्यात आला.

- संजय सोनार 

जळगाव -चाळीसगाव तालुक्यातील ओझरनजीक रविवारी सकाळी झालेल्या क्रिकेट स्पर्धेतील वादाचे पर्यवसान खुनात झाले. मुंबई येथे कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा चाळीसगाव शहरात तलवारीचे वार करीत खून करण्यात आला. ही घटना रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पाटणा रोडवर घडली. याप्रकरणी चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

शुभम अर्जुन आगोणे (वय २८, रा. चाळीसगाव) असे मृत पोलिसाचे नाव आहे. खुनाच्या घटनेने शहर हादरले आहे.चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे रविवारी सकाळी क्रिकेटचे सामने झाले. या सामन्यावेळी एका गटासोबत शुभम आगोणे याचा वाद झाला होता व त्यानंतर रविवारी सायंकाळी हा वाद उफाळून आला. चारजणांनी तलवारीने शुभमवर पाटणारोडवर हल्ला केला. या हल्ल्यात रक्तबंबाळ झाल्यानंतर शुभम आगोणे हा रस्त्यावर पडून होता व नागरिकांना ही माहिती कळताच त्यास चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील व सहकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर चाळीसगाव शहरातील चारजणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव शहर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव