मुंबईत घराच्या छतासह पंखा अंगावर कोसळून वडिलांसह चिमुकला जखमी
By Admin | Updated: April 16, 2017 14:14 IST2017-04-16T11:24:37+5:302017-04-16T14:14:40+5:30
घराच्या छतासह पंखा अंगावर कोसळून वडिलांसह मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या विक्रोळीत ही घटना घडली.

मुंबईत घराच्या छतासह पंखा अंगावर कोसळून वडिलांसह चिमुकला जखमी
>विक्रोळीतील घटना
मुंबई, दि. 16 - घराच्या छतासह पंखा अंगावर कोसळून वडिलांसह मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या विक्रोळीत ही घटना घडली. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे. दोघांवर सायन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. विनोद मोरे (४०), आर्यन मोरे (५) अशी जखमींची नावे असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे.
विक्रोळीच्या कन्नमवार नगर 2 मधील इमारत क्रमांक ७१ मधील तिसऱ्या माजल्यावर रविवारी सकाळी 9 वाजता ही घटना घडली. मोरे कुटुंब भाड्याने गेल्या वर्षभरापासून येथे राहतात. रुग्णालयात काम करत असलेले मोरे पत्नी, मुलगा आर्यन आणि 8 महिन्याच्या मुलीसोबत राहतात. रविवारची सुट्टी असल्याने ते मुलगा आणि मुलीसोबत पंख्याखाली झोपले होते. सकाळी पाणी आल्याने पत्नी स्वयंपाक घरात काम आवरण्यास उठली. तिच्यापाठोपाठ मुलगी आईसोबत स्वयंपाक घरात गेली. अशात सकाळी 9 च्या सुमारास पंखा छतासह खाली कोसळला. यात विनोद आणि आर्यन खाली अड़कले. पंखा विनोद यांच्या छातीवरच कोसल्याने ते यात गंभीर जखमी आहे. . घराच्या भिंतीत विजही प्रवाहीत झाली होती. स्थानीकांच्या मदतीने तब्बल तासाभराने त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तत्काल महात्मा फुले रुग्णालयातुन सायन रुग्णालयात हलविन्याय आले. तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये त्यांची मुलगी आणि पत्नी थोडक्यात बचावली. या घटनेमुळे खळबळ उडाली.
ही इमारत टेकूच्या आधारावर अभी आहे. यापूर्वीही छत कोसळण्याचे प्रकार झाले आहे. गेल्या अनेक वर्षपासून या इमारतीचा पुनर्विकास प्रशासकीय कामांमुळे प्रलंबित आहे. सध्या राहिवाशी जीव मुठित धरून येथे राहत आहेत.