मुंबई मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर
By Admin | Updated: March 29, 2017 13:28 IST2017-03-29T13:25:23+5:302017-03-29T13:28:39+5:30
मुंबई महापालिकेचा 2017-18 चा शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना अतिरीक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर केला.

मुंबई मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई महापालिकेचा 2017-18 चा शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांना अतिरीक्त आयुक्त आय ए कुंदन यांनी शिक्षण समिती अर्थसंकल्प सादर केला.
शिक्षण समितीसाठी यंदा 2311.66 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या शिक्षण समिती अर्थसंकल्पात 83 कोटींची घट झाली आहे.
बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे
डिजीटल स्कूल अंतर्गत 1200 महापालिकेच्या शाळा डिजीटल होणार असून यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद
बंद झालेल्या शाळांचं एकत्रीकरण करुन त्यांची आदर्श शाळांच्या धर्तीवर उभारणी करणार
2017-18 मध्ये आणखी 100 शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात
शाळांमध्ये केंद्रीय ध्वनी क्षेपण यंत्र बसवण्यात येणार असून त्यासाठी 75 लाख रुपयांची तरतूद
26 निवडक शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे निर्माण करणार, यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे
नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युटोरिअल सेंटर उभारणार
व्हर्च्युअल क्लासरूम तयार करणार, याद्वारे मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या एकूण 480 व्हीटीसी शाळामध्ये तज्ज्ञ शिक्षकांची व्याखाने ऐकता येणार आहेत. यात प्राथमिक शाळांसाठी 12.71 कोटी रुपये तर माध्यमिक शाळांसाठी 9.13 कोटी रुपयांची तरतूद
अतिरिक्त शिक्षणाधिकारी हे पद नव्यानं तयार करण्यात येणार
21 क्रीडा केंद्रावर 10 ते 12 वर्षांखालील 612 विद्यार्थ्यांसाठी 21 कोच आणि 7 प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे, यासाठी 38.62 लाख रुपयांची तरतूद
तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती असते, ही भीती घालवण्यासाठी गणित ऑलिम्पियड भरवण्यात येणार.