शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

मुंबईत महापौर शिवसेनेचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2017 06:15 IST

‘मिशन १००’ घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजपाने आपला महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला आहे

मुंबई : ‘मिशन १००’ घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उतरलेल्या भाजपाने आपला महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. मात्र निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भगवाच फडकणार आणि महापौर शिवसेनेचाच असेल, अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केली. पालिकेच्या कार्यक्रमात एकाच मंचावर असताना ठाकरे यांनी गर्जना करत मित्रपक्षाला थेट आव्हान दिले. समाजसुधारक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे पालिका सभागृहात आज अनावरण करण्यात आले. या वेळी भाषणात उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षाचा अप्रत्यक्ष समाचार घेतला. मुंबईत अनेक कावळे काव काव करतात. महापालिकेच्या कारभारावर टीका करणारेही अनेक आहेत, असा टोला या वेळी लगावला. महापालिकेच्या कारभाराची पाच वर्षांची कारकिर्द पूर्ण होत असताना मी आलो आहे. पुन्हा निवडणुकीनंतर मार्चमध्ये येईन, तेव्हा महापौर आपलाच असणार, असे त्यांनी ठासून सांगितले.बजेट मोठे, बँकांमध्ये मोठ्या ठेवी मात्र विकासकामे नाहीत, पालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार अधिक, असे अनेक आरोप भाजपातून झाले आहेत. त्याचे अप्रत्यक्ष स्मरण करत मुख्यमंत्री आणि भाजपाला ठाकरे यांनी धन्यवाद दिले. तुम्ही खांद्याला खांदा लावून रहिला नसतात तर महापालिकेचे एकही काम पूर्ण झाले नसते. महापालिकेत शिवसेनेने केलेल्या कामांमध्ये भाजपाचाही मोलाचा वाटा असल्याचा चिमटा ठाकरे यांनी काढला. मात्र मुख्यमंत्र्यांनी या टोलेबाजीवर कोणतेही राजकीय प्रत्युत्तर देणे टाळले. 

पारदर्शक कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचा आग्रहगेल्या वर्षभरात महापालिकेत अनेक घोटाळे उघड झाल्यामुळे भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी यावर महापालिकेच्या कार्यक्रमात कोणतेही विधान करणे टाळले. आॅनलाइन परवाने दिल्यामुळे जागतिक बँकेत महापालिकेची रँकिंग वाढेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महापालिकेत मोठ्या प्रमाणावर माहिती अधिकाराखाली अर्ज केले जातात. पालिकेच्या कारभाराची सर्व माहिती वेब पोर्टलवर आल्यास अशा प्रकारच्या अर्जांची संख्या दहा टक्क्यांवर येईल. तसेच प्रशासनावर आपोआपच अंकुश येऊन कारभार पारदर्शक होईल, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

शिवसेनेने थोपटली स्वत:ची पाठपारदर्शकता दुर्मीळ होत चालली असताना महापालिकेचा कारभार अधिकाधिक पारदर्शक करण्याचा आयुक्तांचा प्रयत्न आहे. कोणाच्या मनात या बाबत किंतु-परंतु असता कामा नये. कारभार स्वच्छ असला पाहिजे. देशात इतका स्वच्छ आणि पारदर्शक कारभार असलेली मुंबई महापालिका एकमेव असल्याचे छातीठोकपणे सांगत उद्धव ठाकरे यांनी स्वत:चीच पाठ थोपटली.

महापौरांकडे प्रबोधनकारांचे लक्षप्रबोधनकारांचे तैलचित्र महापालिका मुख्यालयातील सभागृहात महापौरांच्या आसनासमोर लावण्यात आले आहे. त्यामुळे महापौरांच्या कारभारावर प्रबोधनकारांचे लक्ष राहील, असा इशारा त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला.

पालिकेत होती ११ तैलचित्रेमहापालिकेच्या सभागृहात एकूण ११ तैलचित्रे होती. मात्र सन २००० मध्ये सभागृहात लागलेल्या आगीत नऊ तैलचित्रे खाक झाली. नूतनीकरणानंतर मात्र ही तैलचित्रे लावण्यात आली नव्हती. मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सेनानी आचार्य दोंदे यांची तैलचित्रे आहेत. त्यानंतर आता प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र आज लावण्यात आले.

प्रबोधनकारांची आठवण थोडी उशिरानेप्रबोधनकार ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे आजोबा. मात्र त्यांचे तैलचित्र सभागृहात लावण्याचा ठराव मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी पालिका महासभेपुढे २०१४ मध्ये मांडला होता. त्यानंतर जाग आलेल्या शिवसेनेने आपल्या नगरसेवकाच्या माध्यमातून हा प्रस्ताव महापालिकेपुढे आणला. यावर अप्रत्यक्ष टोला लगावत प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात थोडा उशीरच झाला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.