मुंबई मॅरेथॉन : भारतीय महिलांमध्ये महाराष्ट्राची ज्योती गवते अव्वल

By Admin | Updated: January 15, 2017 18:39 IST2017-01-15T17:45:09+5:302017-01-15T18:39:06+5:30

मुंबई मॅरेथॉनमधील भारतीय महिला गटात महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पटकावले.

Mumbai Marathon: Among the Indian women, Jyoti Gates of Maharashtra is the top | मुंबई मॅरेथॉन : भारतीय महिलांमध्ये महाराष्ट्राची ज्योती गवते अव्वल

मुंबई मॅरेथॉन : भारतीय महिलांमध्ये महाराष्ट्राची ज्योती गवते अव्वल

  रोहित नाईक/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 -  मुंबई मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात अपेक्षेप्रमाणे लष्कराच्या धावपटूंचे निर्विवाद वर्चस्व राहिले. आॅलिम्पियन खेता राम, बहादुर सिंग धोनी आणि टीएच संजित लुवांग या लष्कराच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकावर नाव कोरले. त्याचवेळी भारतीय महिला गटात महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण पटकावले. तर, पश्चिम बंगालची श्यामली सिंग आणि पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेली लेह-लडाखची जिगमेट डोल्मा यांना अनुक्रमे रौप व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
यंदा धावपटूंच्या कामगिरीवर हवामानाचा बराच परिणाम झाला. पुर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुषांची स्पर्धा अत्यंत अटीतटीची झाली. विजेत्या खेतारामने २ तास १९ मिनिटे ५१ सेकंदाची वेळ देत शर्यत पुर्ण केली. तर, बहादुर सिंग धोनीने २ तास १९ मिनिटे ५७ सेकंदाची वेळ दिली. संजित लुवांगने २ तास २१ मिनिटे १९ सेकंदाच्या वेळेसह कांस्य पटकावले. जवळजवळ ३० किमी अंतरापर्यंत तिन्ही विजेते धावपटू एकत्रित होते. मात्र नंतर खेतारामने वेग वाढवत काहीशी आघाडी मिळवली. अखेरच्या ३ किमीमध्ये धोनीने वेग वाढवताना खेतारामला गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनुभवाच्या जोरावर खेतारामने आपली आघाडी कायम राखत बाजी मारली.

महिलांध्ये महाराष्ट्राची अनुभवी धावपटू ज्योती गवातेने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने २ तास ५० मिनिट ५३ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवताना सहज बाजी मारली. विशेष म्हणजे द्वितीय स्थानी राहिलेल्या बंगालच्या श्यामली सिंगला तिने तब्बल १५-१६ मिनिटांनी पिछाडीवर टाकले. श्यामलीने ३ तास ८ मिनिटे ४१ सेकंदाची वेळ दिली. तर, पहिल्यांदाच मुख्य मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या जिगमेट डोल्माने लक्षवेधी कामगिरी करताना ३ तास १४ मिनिटे ३८ सेकंदाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना कांस्य पदक पटकावले.

Web Title: Mumbai Marathon: Among the Indian women, Jyoti Gates of Maharashtra is the top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.