शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते लातूर नवा राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 04:28 IST

मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे.

- अभिजित कोळपेपुणे - मुंबई ते लातूर असा नवा राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला आहे. मुंबई ते पुणे असा जुना रस्ता तयार आहे. त्यामुळे आता तळेगाव दाभाडे ते लातूर या पुढील रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तळेगाव दाभाडे-चाकण-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे ते न्हावरा, तर दुसऱ्या टप्प्यात अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी-जामखेड बीड ते लातूर असा मार्ग करण्यात येणार असून, एकूण ५५० किलोमीटरचा हा नवा ‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी’ नावाने ओळखला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.या नव्या राष्टÑीय महामार्गामुळे लातूरला जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. पूर्वी पुण्याहून बीड-लातूरला जाण्यासाठी पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्ग असे दोन पर्याय होते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राज्य महामार्ग म्हणून चाकण ते न्हावरा असे नियोजित केले होते. त्यातील चाकण ते शिक्रापूर हा चारपदरी रस्ता सुस्थितीत असून वापरात आहे. तर शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरच्या रस्त्यासाठी सर्व्हे करून एका बाजूचे भूसंपादन करून संबंधित शेतकºयांना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मोबदला यापूर्वीच देण्यात आला आहे. सहा ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे़३६ किलोमीटरचा रस्ता रखडला- शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरचा रस्ता रखडला आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी मागील काही वर्षांपासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व्हे करून एका बाजूने भूसंपादन करून दोन वर्षांपूर्वी शेतकºयांना मोबदलाही दिला आहे.- मात्र प्रत्यक्ष कामाला मुहूर्त लागला नाही. तळेगाव दाभाडेमार्गे बीड-लातूरला जाणाºया महामार्गावर चाकणच्या आंबेठाण चौकातून भुयारी मार्ग, तर पुणे-नाशिक महामार्गावर उड्डाणपूल बनवण्यात येणार आहे. तसेच पुढे शिक्रापूर येथे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन या मार्गावर भुयारी, तर पुणे-अहमदनगर मार्गावर उड्डाणपूल प्रस्तावित आहे.वाढीव मोबदला द्याराज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी शिक्रापूर ते न्हावरा असा ३६.९ किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एका बाजूने भूसंपादन केले आहे. शिक्रापूर ते न्हावरा या रस्त्यासाठी एका बाजूने झालेले भूसंपादनातील काही शेतकºयांनी आता नव्याने वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी केली आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गMaharashtraमहाराष्ट्र