शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

मुंबई : भारताचे जागतिक महाद्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 04:37 IST

भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान.

- सुलक्षणा महाजनमुंबईमधील गेटवे आॅफ इंडिया हे भारतामधून, जगामधून मुंबई बघायला येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण. लहानपणी मुंबई बघायला आले असताना ते भव्य आणि देखणे वास्तुशिल्प बघितले होते. भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान.भारतामधील ऐतिहासिक, पारंपरिक शहरांना तटबंदी असे. शहरात प्रवेश करण्यासाठी चारी दिशेला महाद्वारे असत. अशी महाद्वारे ही आपली परंपरा. याउलट लढाईमधील विजय साजरा करण्यासाठी मोठी कमान उभारणे ही पाश्चात्त्यांची परंपरा. या दोन परंपरांच्या संगमातून गेटवेची वास्तुरचना घडली असावी असे मला वाटते. या वास्तूला मुक्तद्वार म्हणायला हवे, कारण ते कधीच बंद होत नाही. मुक्त व्यापाराचा ढोल वाजवत विकसित झालेल्या मुंबईला वेगळ्या तटबंदीची, बाद दरवाजाची आवश्यकता नव्हती. ब्रिटिशांची सत्ता स्थिरावली आणि ब्रिटनची राणी भारताची महाराणी झाली. नंतर पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेटवेची वास्तू बांधली. तेव्हापासून भारताचे सर्वात आधुनिक आणि आकर्षक शहर म्हणून मुंबईची ख्याती जगभर झाली.वास्तुकला शिक्षणाने जागतिकतेचे ज्ञान आणि भान दिले. जगभरातील वास्तुकलेचा इतिहास शिकता शिकता जगाची ओळख व्हायची. त्याचबरोबर भारतीय खंडातील वास्तुकलेचा इतिहास, येथील विविध काळातील वास्तुशैलींचा अभ्यास तर तपशिलात केला जायचा. मुंबईमधील फोर्ट विभाग म्हणजे वास्तुकलेचा, अनेक शैलींचा संगम असलेला जिताजागता इतिहास. जे.जे. कला महाविद्यालयातील दगडी वास्तू ब्रिटिश क्लासिक शैलीची ओळख करून देणारी होती. मुंबई महापालिका, व्ही.टी. रेल्वे स्टेशन या वास्तू गॉथिक शैलीचे सुंदर नमुने युरोपच्या संस्कृतीशी नाळ जोडून द्यायचे. याशिवाय आधुनिक काळातील आर्ट डेको शैलीतील रिगल, इरॉस, मेट्रो सिनेमागृहे, मरिन ड्राइव्हवरील इमारती, आणि नंतरच्या जीवन बिमासारख्या आधुनिक शैलीतील वास्तू आजूबाजूला असताना जगाचे भान यायचे. मुंबादेवी मंदिर, गिरगाव, गिरणगाव, भायखळ्यातील मशिदी आणि चर्च यामधून मुंबईचे सर्वधर्मीय स्थानिक स्वरूप समजून यायचे. स्थानिक, भारतीय आणि जागतिक वास्तुकलेचा सुंदर मिलाफ असलेले हे महानगर. आज मुंबईचे भौतिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वरूप पार बदलले आहे. इथला प्रत्येक विभाग आता स्वत:चा विचार करतो. मुंबई बेट, उपनगरे यात तणाव आहेत.जगभरातील लोक मुंबईला जागतिक महानगर मानत असले तरी उपनगरे मात्र गोंधळली आहेत. ६० वर्षांपूर्वीची उदार, आशादायी, प्रगत, जगाबरोबर राहणारी मुंबई आता हरवली आहे. एकेकाळी मुंबईत यायला लोक धडपडायचे, आता येथून बाहेर पडण्यासाठी अनेक लोक प्रयत्नशील आहेत. परंतु गेट वे आॅफ इंडियाचे जगाला सन्मुख असलेले महाद्वार आणि मुंबई आता आकर्षक राहिलेली नाही. ते आता गेट अवे, म्हणजेच बाहेर ढकलणारे महाद्वार झाले आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईIndiaभारत