कोलकातावर मुंबई इंडियन्सचा विजय
By Admin | Updated: April 13, 2016 23:44 IST2016-04-13T23:44:54+5:302016-04-13T23:44:54+5:30
मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्सवर 188 धावांचं लक्ष्य पार करत दणदणीत विजय मिळवला आहे.
कोलकातावर मुंबई इंडियन्सचा विजय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३- मुंबई इंडियन्सनं कोलकाता नाइट रायडर्सनं ठेवलेलं 187 धावांचं लक्ष्य पार करत दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्स टीमनं 19 षटकांत 4 गडी गमावूनही विजय संपादन केला आहे. रोहित शर्मानं नाबाद 84 धावा ठोकून मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्मानं 54 बॉलमध्ये 2 षटकार आणि 10 चौकार मारत 84 धावा ठोकल्यात.