IPL च्या वानखेडेवरील मॅचला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील
By Admin | Updated: April 7, 2016 17:02 IST2016-04-07T17:02:14+5:302016-04-07T17:02:14+5:30
मुंबईत सुरु होणा-या आयपीएलच्या ९ एप्रिलच्या पहिल्या सामन्याला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. राज्यात दुष्काळ पडल्याने आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडियमवर होणारा

IPL च्या वानखेडेवरील मॅचला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - मुंबईत सुरु होणा-या आयपीएलच्या ९ एप्रिलच्या पहिल्या सामन्याला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
राज्यात दुष्काळ पडल्याने आयपीएलच्या सामन्यादरम्यान स्टेडियमवर होणारा पाण्याचा अपव्याप टाळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर हायकोर्टाने टँकरच्या पाण्याच्या स्त्रोतांची चौकशी करण्याचे आणि स्टेडियमला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो का? असा राज्य सरकारला सवाल करत याप्रकरणी येत्या १२ तारखेपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच, एकीकडे लोक मरत असताना आपण पाण्याचा उपयोग गार्डन आणि स्टेडियमच्या मेन्टेन्ससाठी करत आहात का? असा सवाल मुंबई क्रिकेट बॉडीला हार्यकोर्टाने विचारला आहे.