दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्ग ठप्प
By Admin | Updated: September 24, 2016 19:41 IST2016-09-24T19:41:13+5:302016-09-24T19:41:13+5:30
मुंबई -गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे

दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्ग ठप्प
>जयंत धुळप / ऑनलाइन लोकमत
अलिबाग, दि. 24 - मुंबई -गोवा महामार्गावरील सुकेळी खिंडीत काल राञी दरड कोसळून तब्बल बारा तासांनी वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र सायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा त्याच जागी दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गे म्हणजे भिसे खिंड- रोहा -कोलाड मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.