भारत पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली. मुरली श्रीराम नाईक (वय, २३) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून तो मुंबईतील घाटकोपर परिसरातील पंतनगर येथील रहिवासी होता. जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना शुक्रवारी पहाटे साडे तीन वाजता भारत पाकिस्तान युद्ध चालू असताना शहीद झाले आहेत.
शहीद जवान मुरली श्रीराम नाईक २०२२ मध्ये भारतीय सैन्यात तैनात झाला. त्याची नाशिक येथील देवळाली येथे ट्रेनिंग झाली. पहिल्यांदा त्याची पोस्टींग आसाम येथे झाली. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना त्यांना युद्धादरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले. मात्र, भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान त्याला वीरमरण आले. शहीद जवान मुरली श्रीराम नाईक यांचे मृतदेह अंत्य विधिकारिता आंध्र प्रदेशातील येथील मूळ गावी कल्की तांडा येथे उद्या (१० मे २०२५) घेऊन जाणार आहेत.
लष्करात तैनात असणारे भारतीय जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले. त्यांचे हे सर्वोच्च बलिदान देश कायम स्मरणात ठेवेल. या कठीण प्रसंगात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत, अशा शब्दांत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शहीद जवान मुरली नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.